रा. शाहू छत्रपती स्मारक भवन – विस्तारीकरणाचा निमित्ताने
‘माझ्या मराठीचिया बोलू कौतुके’ असे संत ज्ञानदेव
म्हणून गेले. हल्ली पुण्यातही शुद्ध मराठी ऐकायला
मिळत नाही. ‘मराठीने केला इंग्रजीस भ्रतार’ यामुळे
वेगळी परिभाषा आजकाल दिसून येते. याला छेद
देण्याचा प्रयत्न ललितकलेच्या या केंद्रात वास्तू
संदर्भात केला आहे…
मूळ वास्तूच्या निमित्ताने…
मूळ वास्तू ‘स्मारक’ ही विशिष्ट संकल्पना (concept) ठेवून उभारणी केलेली आहे. त्यामुळे अशा हेतूने (theme) अनुभवविश्वाचा मागोवा घेताना, आपल्या अस्तित्वाने पाहणाऱ्याचे भावविश्व त्यांनी समृद्ध केलेले आहे. मूळ वास्तूत आर्किटेक्ट बेरी समूहाने स्ट्रक्चर व पॅटर्न यांचे नाते समरस केलेले होते. त्यांची बाह्य काव्यात्मकता (Iyrical quality) कोणत्या प्रमाणात असलेला आकृतिबंधाचा भाग आहे, त्याची मूलाकृती कोणती, हे मी प्रथम अनुभवले. त्याच्या पायाभूत अशा मूलगामी (radical) रेषा कोणत्या आणि हे सर्व कसे गुंफलेले आहे याचा सखोल अभ्यास केला. येथील निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह स्पेस अनुभवताना बाह्य आकाराची समृद्धी जाणवल्याची प्रचिती आली. हे सर्व अनुभवणे अतिशय सुखकारक होते. या जुन्या वास्तूची प्रत्येक भागाची प्रतिमा आपल्या गतीत, वजनात, दिशेस अवधान ठेवीत आलेली होती.. एका आकृतिबंधातून दुसऱ्या आकृतिबंधात टाकलेले ताण पाहणाऱ्याच्या भावस्थितीच्या वलयांना अति समद्ध करतात. थोडक्यात, या वास्तुशिल्पाच्या मूळ आकारपोताला वृंदात्मक (orchestral) दर्शनाने एक शक्ती प्राप्त केल्याची जाणीव होते. गेली ३० वर्षे ‘स्मारक’ व्याख्येचे आपले अस्तित्व या वास्तूच्या किरमिजी तांबूस रंगाने अभंग ठेवले होते. तर असा हा प्रॉडक्ट तयार होताच तेथून तो विस्तारित करण्याच्या भूमिकेतून प्रक्रियेत (process) नेताना त्याचा तोल बिंदू (fulcrum) जाऊ नये, त्याला अर्थपूर्ण कृतीचे (gesture) कोंदण लाभावे, त्याच्या लालित्यपूर्ण प्रतिकात्मकते (ornamental motif)चे विडंबन होऊ नये (intentional distortion) यासाठी अधिक स्पष्टतेने, जाणीवपूर्वक पूर्णाकृतीपर्यंत नेण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
वृंदात्मक (Orchestral) प्रांगण
हे सांस्कृतिक केंद्र आहे. येथे येणाऱ्या कलारसिकांमध्ये रंगाळण्याची वृत्ती आपोआप भिनलेली हे केंद्र पाहण्यापूर्वी व पाहिल्यानंतर रसिकांमध्ये जो एक संवाद होतो त्या संवाददात्यांसाठी हे मी फक्त सभोवताली दोनच पायऱ्यांनी आकृतिबद्ध कल. त्याच्या किनारपट्टीची लांबी वाला यासाठी थोडा लयदार आकार देऊन, साचेबदात विशालता आणावयाचा प्रयत्न केला रेंगाळणाऱ्यांना मध्यवर्ती खोलगट अंगण व चटकन निसटण्यासाठा व्हराडासदृश स्तंभावलीत जाणारा रस्ता हाच अपंगांना (wheelchairs) वापरावयास सुलभ कला. याच प्रागणात ३०४१ मापाचे राजर्षी शाहू छत्रपती यांच्या जीवनपट काळाचे विराट दर्शन घडविणारे भित्तिचित्र (m प्रख्यात शिल्पकार अशोक सुतार यांच्याकडून करून घेतले.
प्रागंणाच्या दुसऱ्या भागात सभागृहाच्या (auditorium) पसेजमधून जाताना राजषी शाहू महाराजांचा पुतळा व चबुतरा उभा केला. मागे लाल गोकाक पाषाणाची सुंदर अर्धचंद्राकृती भिंत त्याला। (backdrop) लाभली आहे. रस्त्यावरून कामाला जाताना पादचाऱ्यांना या विभूतीचे दर्शन व्हावे। म्हणून ही रस्त्यासदृश रचना व मांडणी केलेली आहे. पुतळा कधीही दक्षिणमुखी असत नाही. राजर्षी। शाहूचे कार्य हे संपूर्ण पुरोगामी विचारांचे आहे. त्यामुळे काही पारंपरिक गोष्टींना येथे छेद देण्यात आला आहे. हा मोठा वादाचा विषय होऊ शकतो; पण अभ्यागतांनी त्याला दुजोरा दिला व मंजुरी मिळाली.
पूर्वीचे मध्यवर्ती प्रसाधनगृह हटवून नूतन प्रसाधनगृहास येथूनच बाह्यप्रवेश आहे. वायुविजन चक्र (vent) व वारंवारिता (frequency) यांच्या विचारार्थ त्याचे मध्यवर्ती स्थान स्थलांतरित केले. त्यामुळे संपूर्ण संकुलाचे वातावरण प्रदुषण विरहीत झाले.



स्तंभावली व स्वागत मंडप (Portico)
आधुनिक वास्तुकला ही एक काळाची गरज आहे; पण तिचे अधानुकरण न करता भारतीय रूपातर करणे हे आव्हान आहे. समाजातील सर्व कलाकारांना वास्तू म्हणजे आपलेच व्यासपीठ वाटले पाहिजे. यासाठी या वास्तूत प्रवेशताना दर्शकाला प्रवेशच्छक होण्यासाठी प्रलोभनाची गरज होती. यासाठी अवकाश कल्पनेचा खेळ करणे आवश्यक होते. यासाठी दर्शनी भागात अथांग असा मंडप सवांना सामावून घेणाऱ्या आकारतत्त्वाला साजेसा करण्याचे ठरवले. यासाठी या ढेलजचे (porch) नवे रुपेरी तावदान A.C.P. या धातुपत्र्यांनी मढविले. वेळेअभावी व झटपट कामाच्या उरकासाठी हा निर्णय घेतला; तसेच आधुनिकतेचा मुलामा येण्यासाठी याचा आवश्यकता होती. काँक्रीटमुळे जडत्व प्राप्त होते. हलक्या वजनाच्या धातूमुळे तरलतायत. अन्य छत पेलण्यासाठी स्तंभरचना महत्त्वाची होती. यासाठी चारही स्तंभाच्या तळपटात शालमवा वादकाचा आकार दिला. ताबसर दगडाना नाद यावा यासाठी विशिष्ट परीघ निर्माण कला व उंचीला भक्कम असा आधार दिला. त्यामुळे तेथील प्रशस्त प्रांगणात स्तंभाचा आविष्कार शिल्परूपाने जाणवू येथे प्रवेशताच उच्च दर्जाची अभिरुची निर्माण व्हावी, ही धारणा त्यामागे होती. या पवेशदालनातून विविध उपक्रमांकडे जाण्यासाठी प्रवेशमार्ग आहेत. व्यापारी दालन, संगीत सभा दालन, प्रसाधनगृहे, सभागृहाचे दिंडी दालन, एक की अनेक, या सर्वांना सीमा व हेतू आखून दिलेले आहेत. ते या मंडपसूत्राने एकत्र गुंफले आहेत. विविधतेतच एकात्मता साध्य करावी लागते. या चार स्तंभांच्या निर्मितीने त्याच्या विराट रूपाने चैतन्याची अनुभूती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व वास्तुघटकांची एकात्मता व लयबद्धता हे कलेचे प्राणतत्त्व आहे. त्यामुळे तेथे प्रवेशताच एक मनोहर, चैतन्यमय भाव निर्माण होतात व ते दर्शकांच्या चेहऱ्यांवर जाणवतात.
या वलयांकित वास्तूत भौमितिक आकारांना स्थान कसे द्यावयाचे या संभ्रमात होतो. आपल्या येथे मंगलप्रसंगी रांगोळी काढण्याची प्रथा आहे. ही जमिनीवर रेखाटण्यापेक्षा (plaza) छतावर सदृश आकार निर्माण केल्यास रंगावली व श्री यंत्राचा (abstract form of tantric art) प्रतीकरूपी वापर करता येईल असे वाटले. रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या पादचाऱ्याला या छताच्या नाजूक, कोमल पण सौंदर्यपूर्ण रेखाटनाच्या आविष्कारात कसे गुंतवावे याचे उत्तरही यामुळे मिळाले. तसेच कलात्मकता व आकर्षकता यांचा सुरेख मेळ या मंडपीच्या रूपाने दर्शनी अवतरला व प्रांगणास गवसणी घालणारे एक छत तेथे अवतरले. तेथेच मध्यवर्ती लोंबता १० फूट व्यासाचा लामणदिवा योजिला होता; पण सत्ताबदल, सलग सेवेचा अभाव, प्राधान्यक्रम अशा गदारोळात त्याचा अग्रक्रम निसटला व लक्षवेधी प्रतीक अपूर्ण राहून गेले. संकल्पक म्हणून त्याचे दु:ख जरूर आहे.
लघुकलादालनाची निर्मिती
मूळ कलादालन हे प्रशस्त होते. त्याचा वापर चित्रप्रदर्शनापेक्षा व्यापारी वृत्तीसाठी जास्त होत असे. चित्रकार समूहाची खास कलादालनाची मागणी साचून होती. पण योग्य जागा उपलब्ध नव्हती. मध्यवर्ती असलेल्या स्वच्छतागृहाच्या पाण्याच्या नियोजनाअभावी अस्वच्छता व दुर्गंधी साचे. | सदर स्वच्छतागृहे तेथून हलवून तेथे कलादालनाचा प्रस्ताव सादर केला. त्यास अनेक मतांतरे होती. मध्यवर्ती कलास्थानाचे महत्त्व कथन केले. नंतर त्यास होकार मिळाला. स्तंभाचा होत असलेला अडथळा योग्य पद्धतीने हाताळून त्याचे अस्तित्व एकरूप केले व एका चित्रकाराच्या आवाक्यात येईल असे कलादालन साध्य झाले.
स्थापत्यशास्त्रातील आव्हाने :
लघु सभागृह या संकुलातील सर्वांत मोठे आव्हान होते ते नूतन लघु सभागृहाचे. मागणी होती २०० आसनांच्या दालनाची. कलादालनाचे मूळ छप्पर हे अवरण -तुळयांचे (inverted beam)
असल्याने त्यावर वरील मजल्यांची तख्तपोशी बनविणे हे एक कर्म होते. पोलादी तुळया व त्यावर हलक्या वजनाचे (siporex) स्लॅब अंथरूण, उपइमल्याची उभारणी केली; तसेच
खालिल वास्तूवर भार येऊ नये यासाठी तळमजल्याचा मूळ सांगाडा सशक्त करणे आवश्यक होते.
पाली मळ खांब जोडस्तंभांनी बळकट केले गेले. स्तंभ व तुळया यांच्या जोडांना बेळके (bracket) मोन ताणविरहित रचना केली. तात्पर्य, संपूर्ण तळमजल्याची पेटीसदृश रचना बंदिस्त केली व 10 आसनांच्या क्षमतेचे लघु सभादालन अस्तित्वात आणले. एकूण ३ अभियांत्रिकी तज्ञांनी या उभारणीस साहाय्य केले.
वाचनालयाचा विस्तार:
वाचनसंस्कृती हा मध्यमवर्गीयांना ज्ञानसंपादनाला दिलासा देणारा छंद होय. सद्यःस्थितीतील वाचनालय विभाग, प्राप्त परिस्थितीत दबून (empitchment) गेला होता. विद्यार्थिगण व नोकरवृंद यांना दिवेलागणीच्या वेळीच ज्ञानसंपादनास फुरसत मिळे. स्त्रीवर्गाला अंतःस्थ जागी वर्दळीस्तव दडपण येई. यास्तव दर्शनी व जागरूक स्थानात वाचनालय असावे, ही मुख्य मागणी होती; पण वर्दळीची जागा अध्ययनासाठी निवडणे हे अवलक्षण होते. हे माहिती असूनही, चिंचोळी पण पट्टीसदृश जागा सभागृहाच्या ओसरीवर निर्मिली. तीन स्तरांवर विविध विभागांची मांडणी तेथे केलेली आहे. दर्शनी देवडीतून (lobby) सोपानमार्ग (staircase) योजिला आहे. हे कौशल्यपूर्ण जोडकाम करण्यास प्रयास करावे लागले



मुख्य सभागृहाचे विस्तारीकरण
मूळ सभागृहाची आसनक्षमता ३६० होती व त्यास एकच मध्यवर्ती प्रवेशमार्ग होता. परिस्थितीनुरूप त्यात बदल होत गेला. कायद्याचा अंमल वाढू लागला. त्यानुसार सभागृहाच्या दोन्ही बाजूंकडील मिता निखळून तेथे नवा प्रवेशमार्ग निश्चित केला. दक्षिणेकडील विस्तार पूर्ण झाला. याच धतीवर उत्तरेकडील मार्ग अद्याप अपूर्ण आहे, तो पुढे पूर्ण होईल.
मख्य व्यासपीठ हे मोठ्या नाटक सेट मांडणीसाठी अपुरी पडे. यासाठी स्टेजला जोडून असलेली जागा उपाहारगृहाची भाडेकरारावर भाडेकरूंना दिलेली आहे. ती परत मिळताच बॅकस्टेजचा विस्तार होईल. तेथील संलग्न असलेल्या सोई व गरजा तेथेच फुगवून विस्तारित केल्या आहेत गोलाकार आकारांची लय कायम ठेवली आहे. प्रदक्षिणा पथ
यापूर्वी या वास्तूसभोवतालचे अंगण (court) हे प्रत्येक उपक्रमासाठी वेगळे साकारले होते. त्या काळी उपक्रमांचे अस्तित्व वेगळे राखणे हे रचनेचे वैशिष्ट्य होते. एका बंदिस्त कक्षात असताना दुसऱ्या अंगणातील हालचाली दुर्लक्षित (cross-vision) व्हाव्या हा प्रधान हेतू. एका सीमान्त जगाचा तो एक कालखंड होता.
आधुनिक काळात घेतलेला वेग, त्याला हवा असणारा एकजिनसीपणा व सलगता ही आधुनिक वास्तुकलेची वैशिष्ट्ये आहेत. यासाठी त्याची विविध लयदार असणारी सद्य कुंपणाची तटबंदी कमी करून ती सलग अशा प्रदक्षिणा पथ सदृश जोडली व त्यास दूर कोपऱ्यातून प्रवेश रचिला व अभ्यागतांना (visitor) अंगणाची भव्यता नजरेत आणून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. त्यास जोडणारा, चढेलसा, रुंद असा भपकेदार सोपानमार्ग योजिला. सगळेच कसे शोभेसे, अचाट पण खणखणीत. किरट कमकुवत असं नाहीच इथं. कोल्हापुरी वारसा सांगत कौतुक करतचं येणाऱ्याने यावे. इथं येणाऱ्यांच्या दिवसाची सुरुवात रसिक आणि नवरंगी होते. या भव्य प्रांगणाला पारंपरिक जाळीदार कुंपण होतेच. त्याला अब्दागीरी स्वरूप असलेली जाहिरातीचे पोल जडविले व राजदिंडीचे रूप प्राप्त करून दिले. या जागेत असणारा कमलकुंज (water pond) ही एक उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना होता; पण येथील उदासीनतेने त्याची फार दुर्दशा झाली. मोठ्या कष्टाने मला तो काढून टाकावा लागला.
समारोप
प्रत्यक्ष जीवनात विसंगती, विषमता, अपूर्णता असते. कला या साऱ्यात एक भावविश्व निर्माण करत असते, कला हे एक छोटे विश्व आहे. कुशल रचना, समतोलपणा, सुसंवाद याने त्याला सौष्ठव आणता येते. त्यामुळे एक पूर्णत्वाची व सौंदर्यांची अनुभूती तेथील वातावरणात आणता येते. हे ‘फील’ फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे वास्तूघटक आणि तंत्र यांच्यातील यांत्रिकता येथे गौण ठरतात. आपल्याकडे दुपारचं उन्ह असल्याने, या वास्तूला रंग गडद वापरले. आग्नेय दिशेने आलेले सूर्याचे किरण, या वास्तूच्या अनेक प्रकारच्या पृष्ठभागाने ते झेलले आहेत. कलेचे केंद्र असल्यानं आसपास तरुणाई रेंगाळताना दिसते. अशा या बहुरंगी सड्यानं (Festive) एरवी गंभीर, काळोखं नि उदास भासणारं स्मारक आनंदी झालेलं सापडतं, नाहीतर अनेक स्मारकं कोमामध्ये गेल्यासारखी दिसतात. ही वास्तू एक सांस्कृतिक केंद्र आहे. त्यामुळे या वास्तूत येताना वास्तूच्या स्वरूपाचा संबंध त्या कलाकृतीच्या रसास्वादाशी असावा असे वाटते. नकाशे रेखाटने, मोजमापे, कायदेकानून अशा अनावश्यक यांत्रिक व तांत्रिक बाबीची चर्चा होण्यापेक्षा, या केद्रांचे पुनर्निर्मितीचे स्वरूप न्याहाळणे, मन व रसिकता अधिकाधीक समृद्ध करणे, सकस अणि सुजाण होणे, ते मला महत्त्वाचे वाटते. अशा विचाराच्या दर्शनोच्छुकांच्या आगमनाचे मनापासून येथे स्वागत आहे.


